सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मोरगाव
बारामती तालुक्यातील सायंबाची वाडी येथील प्रमोद दिलीप जगताप या युवा उपसरपंचाने आपल्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचा अनोखा उपक्रम राबविला आहे . रक्तदान करणाऱ्या व्यक्तिला एक लाख रुपयांचे विमा संरक्षण दिल्याने अनेकांनी प्रतिसाद देत १६० बाटल्या रक्तदान झाले आहे .
ऱाज्यात कोरोना रुग्नांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांना रक्त पुरवठा कमी पडू नये म्हणून माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सायंबाचीवाडी येथील युवक उपसरपंच प्रमोद दिलीप जगताप यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोणी भापकर,सायंबाचीवाडी व मासाळवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक दिलीप जगताप, लालासाहेब नलावडे, निरा मार्केट कमिटीचे सभापती मुरलीधर ठोंबरे, माजी सभापती भाऊसाहेब कांबळे, सरपंच रविंद्र भापकर,माजी सरपंच विजय बारवकर,माजी उपसरपंच नारायण भापकर,बाळासाहेब जगदाळे, सोनाजी ठोंबरे,पोलीस पाटील गोविंद जगताप यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉ. माने ,रमेश जाधव, पुणे येथील ससून रुग्णालय व जहांगीर हॉस्पिटल बल्ड बॅंकेचे कर्मचारी उपस्थित होते.