कौतुकास्पद ! लॉकडाऊन काळात सोमेश्वर पेट्रोलपंपाची उच्चांकी पेट्रोल डिझेलची विक्री : एचपीच्या ८१ पेट्रोल पंपात पहिल्या क्रमांकावर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना संचालित हिंदुस्थान पेट्रोलियम च्या सोमेश्वर पेट्रोल पंपाने लॉकडाऊन च्या एप्रिल महिन्यात ५ लाख १६ हजार लिटर पेट्रोल व डिझेलची विक्री करत बारामती सेल्स विभागातील हडपसर ते अकलूज पर्यंतच्या ८१ पेट्रोल पंपात बाजी मारली आहे.
           एप्रिल महिन्यात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच पेट्रोल पंपाची पेट्रोल व डिझेल विक्री कमी झाली होती. मात्र सोमेश्वर कारखान्याच्या पेट्रोल पंपाने एप्रिल महिन्यात तब्बल ५ लाख १६ हजार लिटर पेट्रोल व डिझेलची विक्री करून बारामती सेल्स विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 
            यामध्ये  १. सोमेश्वर कारखाना पेट्रोल पंप ५ लाख १६ हजार लिटर, २. संजय सर्व्हिस स्टेशन ४ लाख ४६ हजार लिटर, ३. शिवाजी सर्व्हिस स्टेशन ४ लाख ४० हजार लिटर, ४. ईश्वरी पेट्रोलियम ४ लाख २८ हजार लिटर तर ५. ओम साई पेट्रोलियमने ३ लाख ६० हजार लिटर पेट्रोल व डिझेलची विक्री केली आहे. 
        याबद्दल सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी पेट्रोल पंप स्टाफ चे अभिनंदन केले आहे.
To Top