जिल्हा परिषद सदस्या यांच्या पतीवर गोळीबार : रविराज तावरे जखमी

Admin
जिल्हा परिषद सदस्या यांच्या पतीवर गोळीबार : रविराज तावरे जखमी

सोमेश्वर रिपोर्टर टीम----

 माळेगावच्या जिल्हा परिषद सदस्य रोहिणी तावरे यांचे पती
रविराज तावरे लाखे यांच्यावर आज संध्याकाळी गोळीबार झाला.बारामतीतील खासगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. रविराज तावरे यांना एक गोळी लागल्याची प्राथमिक माहिती आहे.
त्यांना बारामतीतील खासगी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल केला आहे. मात्र हा गोळीबार का झाला आणि कोणी केला याचा तपास पोलीस करत आहेत . बारामतीतील बारामती हॉस्पिटल मध्ये त्यांना उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले आहे. तीलसंभाजीनगर भागात हा गोळीबार झाल्याचे सांगितले जात आहे.
अजून या विषयी पूर्ण माहिती नाही. तसेच पोलिसांकडूनही
यासंदर्भात गुप्तता पाळली जात आहे त्यामुळे बारामती शहरातखळबळ उडाली आहे.

To Top