सुपेत होणार साठ बेडचे कोविड केअर सेंटर व विलगीकरण कक्ष : तीस बेडचे ऑक्सीजन कक्षाचिही निर्मिर्ती

Admin
सुपे : सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----

बारामती तालुक्यातील सुपे परिसरातील वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या प्रमाणाने याठिकाणी कोविड सेंटर व विलगीकरण कक्ष सुरू होणार असुन येथील शहाजी विद्यालय इमारत, सौर अभ्यासिका इमारत व ग्रामीण रूग्णालयासह आदी ठिकाणाची पाहणी उपमुख्यमंत्री आदेशानुसार पदाधिकाऱ्यांनी केली ,
 या प्रसंगी बारामती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील , गटविकास अधिकारी राहुल काळभोर , तालुका वैद्यकिय अधिकारी मनोज खोमणे , तसेच राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर , मा.सभापती नीता बारवकर , उपसभापती रोहित कोकरे ,जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे , मा सभापती शौकत कोतवाल , तालुका युवक उपाध्यक्ष अनिल हिरवे , अशोक लोणकर युवा कार्यकर्ते रोहन सरोदे , सुयश जगताप , आदी उपस्थित होते , श्री शहाजी विद्यालयाच्या इमारतीमध्ये विलगीकरण कक्ष करण्यात येणार असुन परिसरातील युवक वर्गाने या सेंटरसाठी स्वंयस्फुर्तीने सहभाग दर्शवावा ,
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार सुपे येथे तीस बेडचे कोविड केअर सेंटर व तीस बेडचे विलगीकरण कक्ष सुरू होणार असुन ऑक्सिजन बेडचा निर्मितीचे कार्य जुन्या ग्रामीण रूग्णालयात सुरू आहे , येणाऱ्या एक आठवड्याचा काळात हे सेंटर करण्याचा प्रयत्न आहे, या कोविड केअर सेंटरमध्ये रूग्णाचा सर्व सुविधा संपन्न असे असेल अशी माहिती जेष्ठ नगरसेवक किरण गुजर सह बाधकाम अभियंता ओव्हाळ यांनी दिली 
To Top