मोरगाव : सोमेश्वर रिपोर्टर न्युज------
बारामती तालुक्यातील मोरगाव सह परिसरात वाढती कोरणा रुग्णांची संख्या लक्षात घेता येथील आरोग्य विभाग, मोरगाव फाउंडेशन व ग्रामपंचायत मोरगाव यांच्या विद्यमाने 50 बेडचे कोरणा विलगीकरण कक्ष सुरू केले जाणार आहे . या कक्षाशी पाहणी बारामती प्रांताधिकारी दादासो कांबळे यांनी आज केली
मोरगाव सह परिसरात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता , तसेच कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे .मात्र लक्षणे काहीही नाहीत अशा प्रत्येक रुग्णांच्या घरी स्वतंत्र राहण्याची सोय नसल्याने कोरोना यांची संख्या वाढत चालली आहे .यामुळे मोरगांव ग्रामपंचायत ,माहेश्वरी भक्त निवास , जय गणेश प्रतीष्ठाण , संस्कृती युवा प्रतिष्ठान ,व आरोग्य विभागाच्या वतीने कोरोणा विलीनीकरण कक्ष सुरू केला जाणार आहे .यासाठी गावातील खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे , काही दानशूर व्यक्ती , चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वतीने साहित्य तसेच आर्थिक स्वरुपात सहकारी केले असल्याची माहिती सरपंच निलेश केदारी यांनी दिली .
या कक्षाची पाहणी आज दि ५ रोजी बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे ,गटविकास अधिकारी राहुल काळभोर ,तालुका अध्यक्ष संभाजी होळकर , तालुका वैद्यकीय अधिकारी मनोज खोमणे यांनी केली. यावेळी गावचे सरपंच निलेश केदारी ग्रामसेवक मोरेश्वर गाडे , वैद्यकीय अधिकारी बेलदार मॅडम , तसेच फाउंडेशन व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या कक्षामध्ये आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार मोरगाव सह परिसरातील बाधित रुग्णांना यामध्ये ठेवले जाणार आहे .तसेच त्यांच्यावर मोफत औषधोपचार व जेवण नाश्त्याची सोय केली जाणार आहे. रुग्णांची देखभाल करण्यासाठी यामध्ये निवासी वैद्यकीय अधीकारी व कर्मचारी ठेवले जाणार असून पुढील दोन दिवसांमध्ये सुरु होणार आहे .