सोमेश्वर रिपोर्टर न्यूज -----------
लाटे ता. बारामती येथील स्वस्त धान्य दुकानादर रामप्रसाद माने यांनी स्वस्त धान्य दुकानातील स्वस्तधान्य तपासणीबाबत वारंवार टाळाटाळ केल्याने काल प्रशासनाकडून सदरील स्वस्त धान्य दुकान सील करण्यात आले आहे .
लाटे ता. बारामती येतील स्वस्त धान्य दुकानदार रामप्रसाद माने हे स्वस्त धान्य खासगी वाहनातून सरकारी रेशन विकण्याच्या हेतूने तीन चाकी टेम्पो क्रमांक MH12 FD1856 या वाहनातून चार धान्याची पोती भरल्याचा संशय ग्रामस्थ ,सरपंच, पोलिस पाटील यांना आला. त्यांनी या घटनेची चित्रफित तयार केली सदरील चित्रफित तयार करत असता दुकानदाराच्या निदर्शनास आले असता त्यांनी सदरील धान्य हे पुन्हा दुकानात नेऊन ठेवली .
सदरील धान्य दुकानदाराला गावकामगार तलाठी यांनी वारंवार विचारणा केली व धान्य तपासणी करता बोलावले असता धान्य दुकानदार माने हे नेहमी याबाबत टाळाटाळ करीत होते . तसेच प्रशासनाला धान्य तपासणीत व्यत्यय आणल्यामुळे सदरचे धान्य दुकान सील केले आहे . काल दुपारी ३ वाजता को-हाळे बुद्रुक चे गावकामगार तलाठी प्रल्हाद वाळूज व शीर्षणे येथील गावकामगार तलाठी तलवार यांनी ही कारवाई केली .यावेळी सरपंच शितल खलाटे, पोलिस पाटिल रुपाली वाघमारे, ग्रामस्थ सतिश खलाटे,गणेश खलाटे,अशोक खलाटे ,सचिन खलाटे यांनी पंच म्हणुन काम पाहिले.