सोमेश्वर रिपोर्टर न्युज----
बारामती तालुक्याच्या सोमेश्वर पंचक्रोशीत विलगीकरण कक्ष (कोवीड सेंटर) साठी जागा उपलब्ध होऊन या ठिकाणी कोविड सेंटर उभे करावे अशी मागणी अॅड नवनाथ भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
याबाबत अॅड नवनाथ भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवलेल्या इमेल निवेदनात मध्ये म्हनटले आहे की, महाराष्ट्रात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढत
आहे. ग्रामीण भागात देखील या आजाराने मोठे थैमान घातले आहे. सध्या बारामतीमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे हॉस्पीटलमध्ये बेड
कमी पडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये बारामतीच्या सोमेश्वर पंचक्रोशीतील लोकांना
प्रयत्न करुनही खाजगी/सरकारी हॉस्पीटलमध्ये बेड मिळत नाहीत. वेळेत बेड नमिळाल्याने अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. बेड व इतर औषधे
मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सदर गोष्टीबाबत पुणे जिल्हा आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांच्याशी चर्चा केली असता जिल्हा परिषद पुणे तर्फे योग्य ते सहकार्य करण्यास व स्टाफ देण्यास तयार आहेत. परंतू फक्त जागेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
तरी आपणांस नम्र विनंती की, बारामतीच्या सोमेशार पंचकोशीत विलगीकरण कक्षासाठी (कोवीड सेंटर) जागा उपलब्ध होणेबाबत पदाधिकारी । अधिकारी
यांना आपलेमार्फत आदेश व्हावेत ही नम्र विनंती असे निवेदनात म्हनटले आहे.