संजय काकडे यांना मोठी जबाबदारी : भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज------

 माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या खांद्यावर भारतीय जनता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काकडे यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने संजय काकडे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी काळातील पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी पत्राद्वारे संजय काकडे यांच्या नियुक्तीची घोषणा केली. तसे पत्र देखील त्यांना पाठवले आहे.
To Top