सोमेश्वर रिपोर्टर टीम--
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटरला बेड खरेदी करण्यासाठी मुरूम आणि वाणेवाडी गावातील ऊस वाहतूकदार यांचेकडून १८ हजाराचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. तसेच आर्यानुष कंपनीकडून ११ हजार तर जीतेंद्र वीट कारखान्याकडुन ५ हजाराचा धनादेश देण्यात आला.
सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे हे धनादेश सुपूर्त करण्यात आले. यावेळी गौतम काकडे,।धर्यशील काकडे तसेच ऊस वाहतूकदार दादा कदम, प्रभाकर जगताप, विक्रम शिंदे, नितीन जगताप, माऊली कदम, सचिन जगताप, धनाजी मोरे, संजय जगताप, प्रदीप जगताप,दादा चव्हाण व राजेश जगताप तसेच आर्यानुष कंपनीचे विजयसिंह जगताप व कुलदीप शिंदे तसेच जितेंद्र वीट कारखान्याचे डॉ रणजित जगताप उपस्थित होते.