बारामती l मुरुम येथील आरोग्य केंद्रात १० हजार पॅरासिटॅमॉल गोळ्यांचे वाटप

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------

मुरूम (ता. बारामती) येथील आरोग्य उपकेंद्रात १० हजार पॅरासिटॅमॉल गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या मातोश्री सुलोचना शिंदे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीपित्यर्थ या गोळ्यांचे वाटप बुधवारी(दि.२६) रोजी करण्यात आले. थंडी, ताप, अंगदुखी तसेच लसीकरण झालेल्या नागरीकांना प्रत्येकी चार गोळ्या द्याव्या लागतात त्यामुळे या गोळ्या रुग्णांना फायदेशीर ठरत आहेत. 

           यावेळी मुरूमचे उपसरपंच राजेंद्र कदम, मुरुम सोसायटीचे संचालक महेश शिंदे, सदस्य सागर माहुरकर, संदीप कदम, राकेश जगताप, सिध्देश्वर कुंजीर, केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी भोसले, आरोग्य सेवक फिरोज मुलाणी, आरोग्यसेविका सुनीता लकडे आदी उपस्थित होते. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या मुरुममध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ व आरोग्य विभागाने चांगले काम केल्याने रुग्णसंख्या घटली असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.  

To Top