मोठी बातमी : ग्रामपंचायत निधीला कात्री, आता प्रत्येक गावात होणार ३० बेडच कोविड सेंटर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज-------

 ग्रामपंचायतींना विविध विकासकामांसाठी मिळणाऱ्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतील २५ टक्के निधी कोरोना उपाययोजनांवर खर्च करण्यात येणार आहे. केंद्र सरकारतर्फे हा निधी दिला जातो. या निमित्ताने ग्रामपंचायतींना वेगळा निधी देण्याऐवजी त्यांना मिळणाऱ्या निधीतूनच तजवीज करण्यात आली आहे.
       उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गौण खनिज निधीतील २५ टक्के निधी हा आरोग्यविषयक खर्चासाठी वापरला जाईल. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक गावात तीस बेडचे कोविड सेंटर उभारले जाईल. १५व्या वित्त आयोगातील २१५ कोटी रुपये हे आजच्या निर्णयामुळे कोरोना उपाययोजनांसाठी उपलब्ध होणार आहेत.
To Top