आज दिसणार सुपरमुन : चंद्र येणार पृथ्वीच्या जवळ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

चंद्र हा पृथ्वी भोवती लम्ब वर्तुळाकार कक्षे मध्ये फिरत असतो .त्यामुळे तो कधी पृथ्वीच्या जवळ अंतरावरती येतो किंवा लांब अंतरावरती जातो.ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या जवळच्या अंतरावरती येतो त्या स्थानाला पेरीजी असे म्हणतात तर पृथ्वीपासून लांब अंतरावरती असणाऱ्या चंद्राच्या स्थानास अपोजी असे म्हणतात.ज्यावेळी चंद्र हा पृथ्वी च्या जवळ येतो त्या वेळी चंद्राला सुपरमून असे म्हणतात.खगोल शास्त्रात सुपरमून ची कुठलीही अधिकृत व्याख्या नाही.परुंतु अमेरिकन खगोल अभ्यासक रिचर्ड नोले नुसार चंद्र ज्यावेळी पृथ्वी पासून ३६१७६६ किलोमीटर अंतराच्या पेक्षा कमी अंतरावरती येतो त्यावेळी चंद्राला सुपरमून असे म्हणतात.
या वर्षातील पहिले चंद्रग्रहण , दुसरा सुपरमून आणि सुपर ब्लड मून एकाच वेळेस होण्याचा योग २६  मे रोजी आला   आहे. भारतात चंद्रग्रहण हे दुपारी २ वाजून १७ मिनिटांनी सुरु होऊन संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटांनी संपणार आहे.त्यामुळे आपल्या भागातून चंद्र ग्रहण बगावयास मिळणार नाही .
नॉर्थ अमेरिका ,अलास्का ,आशियातील काही भाग ,न्यूझीलंड , ऑस्ट्रेलियाचा काही भाग ,पॅसिफिक ,अटलांटिक ,इंडियन ओशेंन या भागामध्ये चंद्रग्रहण दिसणार आहे.त्यामुळे फक्त त्या भागामधूनच सुपर ब्लड मून बगावयास मिळणार आहे .अर्थात ह्या चंद्रग्रहणाचा वेळेस पृथ्वीच्या वातावरणात असणाऱ्या धूळ आणि ढगा वरती चंद्राचा रंग हा डार्क ब्राऊन किंवा लाल किंवा पिवळा अवलंबून आहे.भारताचा बाबतीत विचार करावयाचा झाल्यास अतिपूर्वेकडील ओरिसा मधील काही भाग , पश्चिम बंगाल ,आसाम , मणिपूर इत्यादी भागामधून अल्प काळासाठी फक्त मोक्ष पाहावयास मिळणार असल्याने व भारताच्या इतर भागामधून ग्रहण पाहवयास मिळणार नाही त्यामुळे भारतामधून सुपर ब्लड मून बगता येणार नाही . परंतु सुपर मून मात्र पाहता येणार आहे .२६ 
मे रोजी  या वर्षातील दिसणाऱ्या    दुसऱ्या सुपरमूनला फुल्ल फ्लॉवर मून  या बरोबर कॉर्न प्लॅंटींग मून किंवा मिल्क मून असे  देखील म्हणतात .  तो एप्रिल  महिन्यात  दिसलेल्या चंद्राच्या अंतरा पेक्षा  १५७ किलोमीटर किंवा ९८ मैल जवळ अंतरावरती दिसणार आहे व त्याचे अंतर हे ३५७४६३ किलोमीटर एवढे आहे .तसेच तो नेहमीच्या चंद्र पेक्षा ७ टक्के मोठा आणि १५ टक्के तेजस्वी दिसणार आहे .
   यापूर्वी २६ जानेवारी १९४८ सालानंतर १४ नोव्हेंबर २०१६ साली चंद्र हा पृथ्वीच्या फार जवळ म्हणजे ३५६५०९ किलोमीटर एवढ्या अंतरावरती आला होतो .यानंतर या अंतरापेक्षा कमी म्हणजेच ३५६४४६ किलोमीटर अंतरावरती चंद्र २५ नोव्हेंबर २०३४ साली येणार आहे .
प्रा .डॉ.मिलिंद मनोहर कारंजकर 
पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख 
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर .
To Top