दरवाढीच्या 'घाण्या'मध्ये अडकली किचनमधील 'तेला'ची फोडणी !

Admin
तुषार धुमाळ
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

एकीकडे  कोरोना महामारीचे संकट त्याला थोपवण्यासाठी राज्य सरकारने लावलेला लॉकडाऊन आणि  त्यातच उद्योग ,व्यवसाय ,धंदे ,नोकरी यावर आलेली शुक्लकाष्ठ आणी आर्थिक चणचण  यामुळे सर्वसामान्यांना  रोजची चूल पेटविणे आता कठीण होऊन बसले आहे. त्यातच भर म्हणून आणखीन खाद्यतेलाचे दर  गगनाला भिडले आहेत  .त्यामुळे गृहिणी रोजची तेलाची फोडणी देणे कठीण बनले आहे.  
        जीवनावश्यक वस्तूमध्ये खाद्यतेल मोडत असल्याने त्या दरावरती राज्य सरकार अथवा केंद्र सरकारचे नियंत्रण का नाही ? खाद्यतेलांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर का जाऊ लागले ?  सर्वसामान्य ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत .खाद्यतेल दरवाढीला कुठेतरी लगाम लागावा यासाठी आता ग्राहक आग्रही  आहेत. 


 देशात एकीकडे पेट्रोल दरवाढीने शतक पार केली असताना सर्वसामान्यांच्या ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली असून खाद्यतेलाचे दर मागील २ ते ३ वर्षांनंतर गगनाला भिडले आहेत मागील वर्षीच्या तुलनेत या वेळेस खाद्यतेलाच्या दरामध्ये किलो ला २५ ते ३० टक्के वाढ झालेली दिसत आहे. 
-----------------------
किमान वर्षभर तरी खाद्यतेलाच्या दरवाढ राहण्याची शक्यता! देशाल्या लागणाऱ्या खाद्यतेलापैकी ५० ते ६० टक्के खाद्यतेलाची गरज हे आयात तेलातून भागवली जाते. त्यामुळे देशांतर्गत तेलाच्या किमती या अर्थातच आंतरराष्ट्रीय दरारवर अवलंबून असतात.
----------------------
त्याचबरोबर मागच्या वर्षी देशात अतिवृष्टीमुळे, महापुर, शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यात तेलबियांचे प्रमाण अधिक होते. आता तेलबियांच्या किमतीत अधिक वाढ झालेय, आता ही वाढ किमान वर्षभर तरी राहिल अशी शक्यता आहे.!
----------------
सद्याचे तेलाचे दर
  तेल नाव            १५ लि. डब्बा       १ लि. किंमत
सियाबीन                 २३५०               १५६.६६
सूर्यफूल                   २६५०                १७६.६६
To Top