सोमेश्वर रिपोर्टर न्युज------
दिवसभर शाळा सुरू असताना ८ तास शिक्षण देऊन खाजगी शाळा पूर्ण फी घेत होत्या मात्र गेल्या दीड वर्षापासून अवघे दोन तास ऑनलाइन शिक्षण असताना देखील पूर्ण फी का? तसेच या शाळांमध्ये नोकरी करणाऱ्या शिक्षकांचे वेळेवर पगार होत असतात मात्र त्यांच्या पगारात कपात केली आहे. याबाबत लोणंद शहर शिवसेनेच्या वतिने शाळेला निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत सेंट अॅन्स शाळेच्या प्राचार्या यांना निवेदन देण्यात आले आहे. नितीन बानगुडे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. सद्या करोना महामारीचे संकट आहे. शाळांनी ५० टक्के फी घेणे बाबत सेंट अॅन्स इंग्लिश मिडियम स्कुल लोणंद यांना निवेदन देण्यात आले यावेळी ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत चर्चा करुन एक ही विद्यार्थी शिक्षणापासुन वंचित रहिला नाही पाहिजे व पालकांची आर्थिक पिळवणूक होवू नयेत. ठाम भुमिका शिवसेना लोणंद शहरच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मांडण्यात आली. यावेळी जेष्ठ शिवसैनिक व वैद्यकीय मदत कक्ष खंडाळा तालुका सहाय्यक लक्ष्मणराव जाधव, लोणंद शिवसेना शहर प्रमुख, संदीप शेळके, उपतालुका प्रमुख संतोष मुसळे वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक सुनिल यादव, अविनाश नलवडे उप शहर प्रमुख शंभुराज भोसले, युवासेना शहर प्रमुख जगन्नाथ येळे, महाराष्ट्र वहातुक सेना शहर प्रमुख हनमंत शेळके (निंबोडी) राहुल शेळके . सुरज घाडगे. अनिल रासकर व इतर मान्यवर उपस्थित होते.