बिबट्याचा शेतात काम करणाऱ्या युवकावर हल्ला : नशीब बलवत्तर म्हणून वाचला जीव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

ओतूर नजीक येथील घुलेपट येथे सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास ऊसात दडून बसलेल्या बिबट्याने शेतात काम
करणाऱ्या युवकावर पाठीमागून हल्ला करत जखमी केले. त्याने आरडा ओरड केल्याने तसेस बिबट्याला प्रतिकार केल्यामुळे बिबट्या पळाला. जखमी युवकाला ओतूर प्राथमिक रुग्णालयात प्रथोमोपचार करून पिंपरी-चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
      निलेश ज्ञानेश्वर घुले (वय ३३, रा.घुलेपट) असे जखमी युवकाचे नाव आहे. घुलेपटात निलेश ज्ञानेश्वर हा शेतात सोयाबीनची पेरणी करण्यासाठी ट्रक्टरच्या सहाय्याने पेरणी पूर्व मशागत पाहण्यासाठी आला होता. ट्रक्टर चालक निघून
गेला होता. निलेश घुले शेताच्या बांधावर मशागतीची पाहणी
करीत असतांना ऊसात दडून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर
पाठिमागुन येत हल्ला केला. निलेशच्या दंडाला चावा घेत त्याला ओरखडले. निलेशने आरडाओरडा केला. तसेच बिबट्याला प्रतिकार केला. दरम्यान निलेशच्या आवाजाने आजुबाजुच्या शेतातील लोक आले. त्यांची चाहूल लागताच बिबट्याने बाजुच्या शेतात धूम ठोकली. या घटनेत निलेशला ३२ जखमा झाल्या आहेत.
To Top