सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणंद पोलिस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की,दिनांक 08.06.2021 रोजी लोणंद पोलीस ठाणे हद्दीत वाठार बुद्रुक ता. खंडाळा गावचे हद्दीतील निरा उजवा कॅनॉलमध्ये अनोळखी इसमाचे प्रेत मिळुन आलेवरुन लोणंद पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू रजि नोंद करण्यात आली होती. सदर अकस्मात मयताचे तपासमध्ये मयत मंगेश सुरेंद्र पोमण वय 35 वर्षे रा.पोमणनगर पिंपळे ता.पुरंदर जि.पुणे याचा अनोळखी इसमाने अज्ञात कारणावरुन खुन करुन प्रेताचे अंगावरील कपडे काढुन ते फेकुन देवुन पुरावा नाहीसा केल्याचे निष्पन्न झाले त्याबाबत लोणंद पोलीस ठाणेस खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला.गुन्हयातील आरोपी वैभव सुभाष जगताप रा.पांगारे ता.पुरंदर यास यापुर्वी अटक करण्यात आली
असुन त्याची पोलीस कोठडी घेण्यात आलेली आहे. दरम्यान गुन्हयातील मुख्य कुख्यात गुंड, तडीपार आरोपी ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे रा.कुडजे ता.हवेली जि.पुणे हा गुन्हा घडले पासुन पोलीसांना गुंगारा देत होता त्याची माहिती विशाल के.वायकर सहायक पोलीस निरीक्षक, लोणंद यांनी माहिती काढुन त्याला नाशिक मधुन स्थानिक पोलीसाचे मदतीने ताब्यात घेवुन दि. 14.06.2021 रोजी अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी घेवुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता तो पुणे येथुन तडीपार असुन त्याचेकडुन कुडजे, पुणे येथुन खुनाचे गुन्हयात वापरलेले गावठी बनावटीचे दोन पिस्टल, एक जिवंत रांऊड व पल्सर मोटार सायकल असे जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत अजयकुमार बन्सल, पोलीस अधिक्षक सातारा, श्री धिरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, श्री.तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे विशाल के. वायकर, सहायक पोलीस निरीक्षक,गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक,पोलीस अंमलदार महेश सपकाळ, विठ्ठल काळे, अविनाश नलवडे, संतोष नाळे, श्रीनाथ कदम,अभिजीत धनवट, सागर धेंडे,अविनाश शिंदे, फैयाज शेख, गोविंद आंधळे, केतन लाळगे, चालक मल्हारी भिसे, यांनी सदर कारवाई केली केले कारवाई बाबत विशाल के.वायकर सहायक पोलीस निरीक्षक, लोणंद व त्याचे सहका-याचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे