पुरंदर l खळद येथे आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह : महिलेच्या शरीरावरील जखमावरून खून झालेचा संशय

Admin
 सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

पुरंदर तालुक्यातील खळद येथे आज सकाळी एका महिलेचा मृत देह आढळून आलंय... रस्त्याचे कडेला झुडपे मध्ये हा मृत देह आढळून आला आहे. या महिलेच्या गळ्यावर  धार दार हत्याराने वार केल्याच्या जखमा असल्याने हा खून असावा अशा संशय व्यक्त करण्यात येत आहे 
    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की आज दिनांक 15 जून रोजी सकाळी याबाबतची खबर खळदच्या पोलीस पाटील 
ऋषाली कादबाने यांनी सासवड पोलिसात दिली आहे.
कादबाने यांना खळद येथील हॉटेल सूर्याच्या समोर एका महिलेचा  मृत देह असल्याची माहिती मिळाली होती......  पोलीस पाटील कादबाने यांनी त्याची प्रत्यक्ष  खात्री केल्यानंतर  याबाबत सासवड पोलीस स्टेशनला माहिती दिली.‌....यानंतर पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व त्यांच्या टीमने या ठिकाणी पाहणी केली असता  35 वर्षीय महिलेचा हा मृत देह असावा अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलीय... त्याच बरोबर या महिलेच्या शरीरावर धारदार हत्याराने वार केल्याच्या जखामही आहेत.त्यामूळे या महीलेचा खून झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे...पोलिसांनी मृत देह ताब्यात घेतला असून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.....महिलेची अद्याप ओळख पटली नसून या संदर्भात पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येत आहे.....
To Top