सोमेश्वर रिपोर्टर टीम------
कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने बारामतीतील मंगळवार (दि. १५) पासून सर्व दुकाने सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत सुरू राहणार आहेत. सोमवारी व्यापारी महासंघ व प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महासंघाचे अध्यक्ष नरेंद्रगुजराथी यांनी
सांगितले.
शहरातील कोरोना ८ जूनपासून बारामतीत सकाळी नऊ ते एक वेळ व्यापाऱ्यांसाठी लागू करण्यात आली
होती. तर अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी सकाळी नऊ ते दुपारी चार अशी होती. आता सर्व दुकाने दुपारी चारपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, प्रशासनाच्या या निर्णयामुळे
दुकानदारांना दिलासा मिळाला असून मागील दोन महिन्यांहून अधिक काळ दुकाने बंद ठेवावी लागलेली असल्याने मोठा आर्थिक फटका, मालाचे
नुकसान सहन करावा लागला आहे.