निरा : सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खा.सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त नीरेतील ८०० गरजूंना अन्नधान्याचे किट घरपोहच करण्यात आले. राधाकृष्ण मंगल कार्यालयात गरजूंना कोरोनाचे नियम पाळत जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात 50 किट वितरण करण्याचा कार्यक्रम आज गुरवारी आयोजित केला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्यासह तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटिल, माजी आमदार अशोक टेकवडे, विजय कोलते, प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, लक्षमण चव्हाण, दत्ताजीराव चव्हाण, उपाध्यक्ष भैय्यासाहेब खाटपे,अनिल चव्हाण जयदिप बारभाई, राजेश चव्हाण, अजिंक्य टेकवडे, पुष्कर जाधव, संदेश पवार, जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल महाडीक आदी मान्यवर उपस्थीत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस नीरा शहर यांच्या मार्गदर्शनाखाली नीरेतील युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत या किराणा किट वाटपाचे नियोजन केले होते. किराणा किट मध्ये दैनंदिनी गरजेच्या तांदूळ, साखर, तेल ,विविध डाळी आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अडचणीच्या काळात समाजातील गरजूंना मदत केल्याने निरेतील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
नीरा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रमोद काकडे, रा.कॉं. तालुका युवक उपाध्यक्ष सुनिल जाधव, रा. काँ. सरचिटणीस विष्णु गडदरे, नीरा शहर रा.काँ. युवक अध्यक्ष ऋषिकेश धायगुडे, नीरा शहर महिला रा.काँ अध्यक्ष तनुजा शहा, नीराशहर उपाध्यक्ष अजय राऊत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नीरा शहर अध्यक्ष कामेश जावळे, राष्ट्रवादी काँग्रेस पंचायत समिती उपाध्यक्ष राजू देसाई व सोशल मीडिया अध्यक्ष नीरा - कोळविहीरे अध्यक्ष अनिकेत सोनवणे कार्याध्यक्ष महेश धायगुडे, संतोष मोहिते यांनसह कार्यकरत्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रा.कॉं. महिला शहर अध्यक्ष तनुजा शहा. तर आभार पुरंदर तालुका युवक उपाध्यक्ष अजित सोनवणे, यांनी मानले.