योगदिनाचे औचित्य साधून बारामतीमध्ये योग शिबिराचे आयोजन

सोमेश्वर रिपोर्टर live
बारामती : सोमेश्वर रिपोर्टर टीम----

नेहरू युवा केंद्र,पुणे (युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय,भारत सरकार) योग महाविद्यालय बारामती आणि सायकल क्लब बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून आज दिनांक २१ जून,२०२१ रोजी योग शिबीराचे बारामती तालुक्यामध्ये आयोजन करण्यात आले होते.
       या कार्यक्रमाचे ऑफलाईन तसेच ऑनलाईन माध्यमातून देखील (facebook,zoom,google meet) आयोजन केले गेले. २०० हून अधिक लोकानी ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात सहभाग नोंदवला,तर ऑफलाईन मध्ये ५० हून अधिक बारामतीकर उपस्थित होते. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला लिंब या वृक्षाचे रोप देऊन त्याची निगा राखण्याबद्दल तसेच पर्यावरणाप्रती असलेल्या आपल्या जबाबदारीची देखील जाणीव करून देण्याचा छोटासा प्रयत्न योगदिनामुळे साध्य होऊ शकला. कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्राच्या बारामती तालुका प्रतिनिधी शुभांगी भाऊसाहेब मोरे व वैभव भापकर बारामती तालुका प्रतिनिधी यांनी केले.
To Top