खेड शिवापूर
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाक्या जवळ एका हॉटेल शेजारी ट्रकमधून वाहतूक होत असलेला एकोणचाळीस लाख रूपये किमतीचा अवैध गुटखा राजगड पोलिसांनी ट्रकसह ताब्यात घेतला.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड
पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे
वाहतूक होत असल्याची खात्रीशीर टिप मिळाली. यानंतर तातडीने राजगड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक निखिल मगदूम, सहायक उपनिरीक्षक कदम, पोलीस हवालदार संतोष तोडकर, संतोष कालेकर, सोमनाथ जाधव इतर कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ट्रकला महामार्गावर अडविले. (क्र. एमएच ०९ सीडब्ल्यू ३८९७) या ट्रकची झडती घेतली असता, ट्रकमध्ये हिरा पान मसाल्याची तब्बल २५० पोती, तसेच हिरव्या रंगाच्या सुगंधी तंबाखूची २५० पोती आढळून आली. हा गुटखा तसेच ट्रक दोन्ही मिळून रक्कम रुपये ५१,३७,५०० ( एक्कावन्न लाख सदतीस हजार पाचशे रुपये) माल जप्त करण्यात आला आहे .
ट्रकमधील असलेला माल स्थानिक पंचांसमक्ष सील करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक निखिल मगदूम करीत आहेत. राजगड पोलिसांच्या या मोठ्या कामगिरीबद्दल अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक होत आहे.