सुपे : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
बारामती तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या अध्यक्षपदी पोपटराव गणपत पानसरे यांची निवड करण्यात आली.
जिल्ह्याचे पालकमंत्री सुचवतील त्यानुसार या समितीची निवड करण्यात येते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार १३ जणांची समिती स्थापन करण्यात आली. त्यानुसार दक्षता समितीच्या अध्यक्षपदी पंचायत समितीचे माजी सभापती पोपट पानसरे यांची निवड करण्यात आली. तर सचिवपदी येथील तहसिलदार यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये विधानपरिषद सदस्य सह अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणुन नगराध्यक्ष, तर पंचायत समिती सभापती, गटविकास अधिकारी हे सदस्य यांच्यासह तीन महिला सदस्य, तर दोन विरोधी सदस्य तर जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले शिधावाटप दुकानदार प्रतिनिधी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती एक एक प्रतिनिधी तर आण्णा हजारे सुचवतील असे एक प्रतिनिधी आदी १३ जणांची दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे.
.......................................