सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती शहर आणि तालुक्यात आज पासून १८ ते ४४ वयोगटातील कोविड १९ चे लसीकरणास सुरुवात होत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
हे १८ ते ४४ वयोगटासाठी लसीकरण चार ठिकाणी होणार आहे.
महिला हॉस्पिटल बारामती,
प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव,
प्राथमिक आरोग्य केंद्र होळ
प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवी
या ठिकाणी लसीकरणाचे प्रत्येकी १०० डोसेस प्रमाणे देण्यात येईल, त्याचप्रमाणे ४५ वर्षावरील नागरिकांना पहिला व दुसरा डोसचे लसीकरण महिला हॉस्पिटल व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात चालू आहे