जागतिक पर्यावरण दिनानिमित्त तीन गावातील ग्रामपंचायत एकत्र : मोरया सायकल क्लब ग्रुपच्या उपक्रमाला दिला पाठिंबा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मनोहर तावरे

आज सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेक ठिकाणी निसर्गप्रेमींनी वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करून जनजागृती केली. मोरगाव परिसरात सक्रिय असलेल्या मोरया सायकल क्लब च्या सदस्यांना तीन ग्रामपंचायत ने संयुक्त पाठिंबा देऊन ही चळवळ गतिमान करण्याचा निश्चय केला आहे. काळखैरेवाडी ग्रामपंचायत हद्दीत आज वृक्षारोपण करण्यात आले.
        बारामती तालुक्यातील अनेक गावात तरुणांच्या पुढाकारातून वृक्षारोपण मोहीम हाती देण्यात आली आहे. मोरया सायकल क्लब ग्रुपचे प्रमुख नवनाथ उर्फ काका भापकर यांनी आज याबाबत अधिक माहिती दिली. ग्रुपचे जवळपास शंभर हून अधिक सदस्य आहेत. गेली काही दिवसांपासून प्रत्येक ग्रुपच्या सदस्यांचे गावात जाऊन वृक्ष लागवड सुरू आहे. आज जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून सार्वजनिक ठिकाणी या वृक्षांची लागवड करण्यात आली.
         या सामाजिक उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी मोरगाव सह काळखैरेवाडी व सुपे ग्रामपंचायत यांनी स्वयंस्फूर्तीने कार्यक्रमात सहभाग घेतला. काळखैरेवाडी ग्रामपंचायत सरपंच विशाल भैया भोंडवे यांनी आज वृक्षारोपणासाठी झाडे व ट्री गार्ड उपलब्ध करून दिली. याप्रसंगी मोरगाव चे सरपंच श्री निलेश केदारी सह विशाल भोंडवे सुपे चे अनिल हिरवे हे प्रमुख उपस्थित होते. बारामती वनविभागाचे प्रकाश चौधरी वनरक्षक योगेश कोकाटे सौ शकुंतला गोरे वनमजूर गणपत भोंडवे सोमनाथ जाधव इत्यादी उपस्थित होते.
To Top