सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील वाकी मगरवाडी रस्त्यावर बिबट्या पाहिल्याची पहिली बातमी सोमेश्वर रिपोर्टर ने प्रसिध्द केली होती. यावर वनविभाग आणि पोलीस यंत्रणेने तात्काळ खबरदारी घेतली होती.
आज गडदरवाडी येथे विराजा खरी क्रशन केंद्रावरून पावणे आठ च्या दरम्यान अभिजित काकडे यांचे गाडी चालक आणि दोन कामगार कामावरून घरी निघाले असताना या तिघांना अवघ्या सात फुटावरून दर्शन झाल्याचे प्रथमदर्शनी सांगितले.