सोमेश्वरनगर परिसरात वरूणराजाची दमदार हजेरी : मात्र १५/६ च्या ऊस लागवडीचा खोळंबा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

वरुण राजाने शनिवार (दि.५)   दुपारी ३ वा पावसाला हलक्या सरींनी सुरुवात झाली. दुपारी बरसल्यानंतर सायंकाळी ६च्या सुमारास पावसाचा जोर चांगलाच वाढला.मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटासह मुसळधार हजेरी लावली सुमारे दिड तास जोरदार पाऊस बरसला. रात्री उशिरापर्यंत हा पावसाचा जोर कायम राहिला. 
       सखल भागांमध्ये पाणी साठले होते ओढे नाले तुडुंब भरून वाहत होते  .या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे  .गेले काही दिवस वातावरणात वाढलेला उष्मा एकदम ओसरला असून गारवा पसरला आहे.
----------
१५/६ च्या ऊस लागवडीचा खोळंबा
गेले दोन वर्षे सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पाऊस दमदार हजेरी लावत आहे. त्यामुळे अनेक ऊसउत्पादक सभासदांना अर्थिक नुकसानिस सामोरे जावे लागले आहे. अति पावसामुळे ऊस कापावे लागल्याने कारखान्याने यावर्षी सभासदांचे नुकसान टाळण्यासाठी ऊस लागवडीला लवकर परवानगी दिली मात्र पावसाने १ जुनलाच दमदार हजेरी लावल्याने १५/६ च्या उसलागवडी कश्या होणार या चिंतेत शेतकरी सापडला आहे. 
---------------
एम.ए.सी.एस आघारकर संशोधन संस्था होळ- सोरटेवाडी फार्म येथे दीड तासात  ४० मि.मी पावसाची नोंद झाली आहे. अशी माहिती अजित चव्हाण यांनी दिली.
To Top