अवघ्या सात फुटावर बिबट्या....! आणि पावसात फुटला घाम... प्रथमदर्शनी पाहणाऱ्यांचा थरकाप उडवणारा अनुभव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज------

बारामती तालुक्यातील पश्चिम भागात बिबट्याने थैमान घातले असून गेल्या आठवड्यात वाकी मगरवाडी येथे बिबट्याचे दर्शन झाल्याचे नागरिकांनी पाहिले होते. काल रात्री पुन्हा गडदरवाडी येथे बिबट्याने निदर्शनास आला आहे.
          काल रात्री पाऊस उघडल्यावर गडदरवाडी येथील विराजा खडी केंद्राचे मालक अभिजित काकडे हे पुढे गेल्यानंतर क्रशवर काम करणारे यासीन शेख, राहुल खताळ, अजित पवार, प्रमोद खंडाळे आणि अशोक पिंगळे हे पाच जण तीन गाड्यावरून घरी निघाले असता अवघ्या सात फुटावर बिबट्याने दर्शन दिल्याने या पाचही जणांच्या अंगाचा थरकाप उडाला. पावसात भिजलो होतो तरी  घाम फुटला असे अजित पवार याने सांगितले गाड्या वळवायचं देखील समजत नव्हतं कशा गाड्या वळवल्या हे आमचं आम्हलाच समजलं नाही गाड्या वळवल्या आणि पुन्हा खडी क्रशन गाठला. 
        बिबट्या रस्तावर जात असताना त्यांच्या मागे कोल्हे आणि लांडगे मोठं मोठ्याने ओरडत होते. असे राहुल खताळ याने सांगितले. 
----------------- 
बिबट्याकडून अजून कोणालाही इजा नाही-------
गेल्या आठवड्यात वाकी मगरवाडी या भागात बिबट्या पहिला गेला. त्यानंतर काल गडदरवाडी याठिकाणी रात्री पुन्हा बिबट्या पहिला गेला. गेल्या आठ दिवसापासून या भागात बिबट्या फिरत असून त्याने अजून कुठल्याही वन्य अथवा मनुष्य प्राण्यावर हल्ला केला नाही. मंग बिबट्या नक्की आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 
----------------------
नागरिकांनी काळजी घ्यावी. वन विभागातील कर्मचारी सतर्कतेने दिवसरात्र त्या परिसरात गस्त करत आहेत . ग्रामस्थांच्या मागणीनुसार बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आम्ही वरिष्ठ कार्यालयास पिंजऱ्याची   मागणी केली आहे .
राहुल काळे वनपरिक्षेत्र अधिकारी, बारामती
To Top