सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील वाणेवाडी ग्रामपंचायतचे कर्मचारी येथील मारुती कांबळे यांनी अजितदादा कोविड सेंटरला आपला एक महिन्याचा पगाराचा सात हजार पाचशे धनादेश दिला.
वाणेवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी मारुती भानुदास कांबळे हे ग्रामपंचायत मध्ये कंत्राटी कामगार म्हणून साफसफाई चे काम करतात. त्यांनी आपला एक महिन्याचा पगार ७ हजार ५०० रुपये रामराजे कार्यालय येथे अजितदादा कोविड सेंटरला दिला.
सोमेश्वर सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी वाणेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक पी के गाढवे, क्लार्क राजू घोरपडे व पाणी पुरवठा कर्मचारी सूर्यकांत जगताप उपस्थित होते.