निंबुत विलीगिकरण कक्षात शुन्य पेशेंट : पुन्हा संकट आले तर सज्ज राहण्याचा ग्रामस्थांनी केला निर्धार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------

गेल्या महिन्यात कोविड रुग्णांचा ४०० वर असलेला आकडा आता ५० वर आल्याने लोकसहभागातून सुरू केलेली कोविड सेंटर आता मोकळी होऊ लागली आहेत. 
              माळेगाव, वाणेवाडी, मोरगाव, सुपे, नीरा, वीर निबुत सर्वच कोविड सेंटर मध्ये आज बोटावर मोजण्या इतपत संख्या आहे. गेल्या महिन्यात निंबुत येथे बारामती तालुक्यातील पाहिले विलीगिकरण कक्ष उभारण्यात आला होता. आज या ठिकाणी शून्य रुग्ण आहेत. मात्र भविष्यात असे संकट आले तर पुन्हा निंबुतकर ग्रामस्थ त्याला सामोरे जातील असा निर्धार केला आहे. 
           निबुत विलीगिकरण कक्षाला वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटर मधून रोजचे जेवण जात होते. याबद्दल सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष व वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटरचे मार्गदर्शक पुरुषोत्तम जगताप यांचा सत्कार निंबुत ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक महेश काकडे, उदय काकडे,बाळासाहेब काकडे, रणजित फरांदे, प्रमोद काकडे, सतीश काकडे, गणेश जगताप, जगन्नाथ जमदाडे, अमित काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top