रस्त्यावरील खड्यात पडून शेकडो जखमी ! बांधकाम विभाग आला मुरूम टाकायला करंजे ग्रामस्थांचे आडमुठे धोरण : मुरूम घेऊन आलेली वाहने लावली हुसकून

Admin
तुषार धुमाळ
सोमेश्वर रिपोर्टर न्युज------

करंजे नागरिकांच्या आडमुठेपणा समोर आला आहे. गेल्या एक महिन्यात करंजेपुल ते सोमेश्वर देवस्थान रस्त्यावर भल्यामोठ्या खड्यात पडून अनेक दुचाकीस्वार जखमी झाले तर अनेकांनी हातपाय मोडून घेतले. मात्र हे सर्व होत असताना स्थानिक ग्रामपंचायत काय करतेय...साधा दोन ट्रेलर मुरूम पण टाकू शकत नाही...अखेल सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवले हा खड्डा बुजवयाचा मात्र स्थानिक नागरिकांच्या  विरोधामुळे बांधकाम विभागाला मुरूमाने भरलेल्या गाड्या परत घेऊन जाव्या लागल्या. 
       सोमेश्वरनगर कारखान्यापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर सोमेश्वर मंदिर हे प्रसिध्द असं देवस्थान आहे  तेथून पुढे सोळा किलोमीटर अंतरावर मोरगाव हे अष्टविनायकांपैकी एक मुख्य देवस्थान आहे या रस्त्यालगत  बारामती तालुक्यातील उत्तर भागातील प्रमुख गावे आहेत यामध्ये करंजे ,लोणी भापकर ,वाकी , मोरगाव,सुपा हि मुख्य गावे अाहे.
शेतकरी, कामगार,स्थानिक नागरीक प्रवासी  या रस्त्यावरून प्रवास करत असतात या रस्त्यावरती करंजे हे गाव पडते या गावामधून हा रस्ता जातो तेथील  चौकामध्ये भले मोठमोठाले खड्डे पडले आहेत त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली आहेत .पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना  अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते हे पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथे तात्पुरती डागडुजी करण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी दोन डंपर मुरूम उपलब्ध करत तिथे तेथील खड्डे बुजविण्याचा सुरूवात केली पण प्रथम डंपरखाली होताच दुसर्या डंपरखाली करू नका आम्ही तुम्हाला इथे काम करून देणार नाही आणि जो खाली केला आहे मुरमाचा डंपर तोही त्या खड्ड्यांमध्ये टाकून देणार नाही अशी आडमुठी भूमिका घेत  सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न तेथील स्थानिक नागरिक करत आहेत या खड्डय़ांमुळे दररोज असंख्य वाहने येथे आदळत आहेत त्यामुळे या इथे कोणता अपघात झाला तर त्यास हे  खड्डे न बुजवून देणारे स्थानिक नागरिकच जबाबदार आहेत  यांच्यावरती अपघातात जखमी होऊन मृत पावलं त्याच्या मृत्यूस जबाबदार म्हणून  त्याच्या वर गुन्हा का दाखल करू नये ?
       तसेच शासकीय कामात अडथळा  आणतात म्हणून यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो ! त्यांच्या आडमुठेपणामुळे तेथील डागडुजीचे काम रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात दररोज एक  तक्रार जात असून स्थानिक पुढारी  तसेच ग्रामपंचायतीने सहकार्य करून हे खड्डे ताबडतोब बुजवावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे
To Top