सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात आज सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
महाविद्यालयाचे संस्थापक मुगुटराव काकडे यांनी १९७२ साली अवघ्या ५० विद्यार्थ्यांवर सुरू झालेले हे महाविद्यालयाचे रूपांतर वटवृक्षात झाले आहे. सुरुवातीला मुगुटराव काकडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. कार्यक्रमात प्रमुखवक्ते म्हणून लातूरच्या शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महादेव गव्हाणे, अध्यक्षस्थानी
महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश काकडे, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, उद्योजक आर एन शिंदे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शहाजी काकडे, नायब तहसिलदार नामदेव काळे, सचिव प्रा जयवंतराव घोरपडे, प्राचार्य जवाहर चौधरी, पूणे जिल्हा बस नियंत्रक रमाकांत गायकवाड, प्रा प्रदीप पाटील, गुलाबराव गायकवाड, प्रा विलास बोबडे, भीमराव बनसोडे, नितीन कुलकर्णी, संजय घाडगे, बापूराव देवकर, बाळासाहेब जगताप यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्तावित प्राचार्य जवाहर चौधरी यांनी सूत्रसंचालन प्रा रवींद्र जगताप तर पाहुण्यांचे स्वागत प्रा राजुरवार यांनी केले.