सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर तालुक्याच्या सीमेवरील पुणे बारामती ही शहरे एकीकडे कोरोनामुक्तीच्या दिशेने आहेत. काल बारामतीत अवघ्या १३ रुग्णांची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे पुरंदर तालुक्यात ३८६ ऍक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुरंदर तालूका लॉकडाऊन होणार का अजून याबाबत कोणताही निर्णय झाला नसला तरी लॉकडाऊन करावा असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
पुरंदर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, ग्रामीण भागात रुग्णाची संख्या लक्षणीय आहे.
सासवड मध्ये कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, त्यामुळे काही प्रमाणात दुकानदारांना सूट देण्यात आली होती,
मात्र गर्दी वाढत असल्याचे निदर्शनास येताच प्रशासनाने दुकाने बंद करावयास लावली. शनिवार व रविवारी फक्त जीवनावश्यक वस्तूच्या दुकानांना परवानगी देण्यात आली, इतर दुकाने बंद करण्यात आली. सासवडचा आठवडा बाजार सोमवारी असतो. बाजाराला परवानगी नाही तरी बाजार भरलेला दिसतो. मास्क लावणे, गर्दी टाळणे याकडे दुर्लक्ष होत आहे नागरिक शिस्त पाळताना दिसत
नाहीत. हॉटेल, ढाबे सरूच आहेत.
दि. २० जून रोजी तालुक्यात ३८६ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामध्ये बेलसर ८१, माळशिरस ५२, नीरा ६३ परीचे ८६, वाल्हा १८, जेजुरी ३१ सासवड ५५ जणांचा समावेश आहे. .