गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे मोरगाव येथील नुकसान झालेल्या गणेशकुंड परिसरातील चिंचवड देवस्थानच्या वतीने डागडुजी सुरू

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

मोरगाव : अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव ता बारामती येथील गणेश कुंड परीसराचे  गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते . नदीवरील पुलाचे सरक्षक  कठडे व शेजारील भराव वाहून गेला होता. याच्या  दुरुस्तीचे काम  चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने सुरु केले असल्याची माहीती विश्वस्त विनोद पवार यांनी दिली .
                 गेल्यावर्षी  ऑक्टोबर महीन्यामध्ये  मध्ये  अवकाळी पावसामुळे कऱ्हानदी पात्राने रुद्र रुप धारण केले होते . यामध्ये नदी पात्राशेजारील अनेक शेतकऱ्यांच्या जमीनीतील माती वाहुन गेल्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते .  मोरगाव येथे गणेश कुंडाशेजारी  नदीपलीकडे असणाऱ्या पवळी येथे महान साधु मोरया गोसावी जन्मस्थळ  आहे .  दसऱ्याला सीमोल्लंघनासाठी मयुरेश्वराचा पालखी सोहळा नदीपलीकडे जातो . नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्यातील पाणी  सोडून दिल्याशिवाय नदीपलीकडे जाता येत नव्हते . यामुळे सीमोल्लंघन व  जन्मस्थळाकडे जाण्यासाठी मुंबई येथील गणेश भक्त  अमृतेताई यांनी गणेश भक्तांसाठी लाखो रुपये खर्च करुन पुल बांधुन दिला आहे . 
          गतवर्षीच्या पावसामुळे या पुलाशेजारील भराव वाहुन गेला होता. तसेच पुलाचे संरक्षक कठडे , गणेश कुंड परीसराचे मोठे नुकसान झाले होते . यामुळे मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी चिंचवड देवस्थान ट्रस्टकडे दुरुस्तीची मागणी केली होती . यानुसार देवस्थानचे  मुख्य विश्वस्त  मंदार देव , विनोद पवार ,  विश्राम देव , आनंद तांबे , राजेंद्र उमाप यांनी हा परीसर दुरुस्त करण्याचा ठराव विश्वस्त मंडळाच्या  बैठकीत संमत केला होता . दुरुस्तीचे काम  सध्या वेगाने सुरु आहे .

...................................................
To Top