सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती तालुक्यातील तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्यपदी सुचिता जगन्नाथ साळवे यांची सदस्यपदी निवड करण्यात करण्यात आली.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णय तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील शासन निर्णयानुसार या निवडी करण्यात आल्या आहेत.
बारामती तालुक्यातुन या समितीवर तीन महिलांची निवड करण्यात आली आहे. तहसीलदार विजय पाटील यांनी नुकतेच साळवे यांना याबाबत निवडीचे पत्र दिले. सुचेता साळवे या बारामती तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस तसेच विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.