येणाऱ्या गळीत हंगामात 'सोमेश्वर'कडे १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध : पुरूषोत्तम जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ऊस गळीत हंगामात सभासदांचा १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असल्याचे सांगत सभासदांव्यतिरिक्त बिगर नोंदीचा तसेच नियमबाह्य ७ ते ८ हजार एकर ऊस उपलब्ध मात्र आपल्या कारखान्याकडे ज्या उसाची नोंद आहे असाच ऊस गाळण्यासाठी संचालक मंडळ बांधील असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी 'सोमेश्वर रिपोर्टर' शी बोलताना सांगितले. 
            जगताप पुढे म्हणाले, सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी तब्बल ३७ हजार ९०८ हजार एकरांवरील तब्बल १५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असून  
बिगर नोंदीचा व नियमबाह्य असा ३ लाख टन उपलब्ध आहे. मात्र नोंदीचा ऊस वगळता इतर ऊस गाळपासाठी आपण बांधील नसल्याचे सांगत ऊस तोडणी मजुरांची घटती संख्या लक्षात घेता इथून पुढच्या काळात शेतकऱ्यांनी आधुनिक ऊस शेतीकडे वळणे गरजेचे आहे. इंदापूर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळाले असून प्रथमच सहा फुटी सरी व दीड फुटावर एक डोळा अशा पद्धतीने ऊस लागवडी करण्यास सुरुवात केली आहे. त्याच धर्तीवर सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या वर्षी जवळपास दीडशे एकर क्षेत्रावर सहफुटी सरीचा प्रयोग राबविला जात आहे. सर्वच शेतकऱ्यांनी अशा पद्धतीच्या आधुनिक शेतीकडे वळावे जेणे करून हार्वेस्टरच्या साहाय्याने ऊसतोड करता येईल.
          गेल्या हंगामात सोमेश्वर ने आपल्या कार्यक्षेत्रातील जवळपास सव्वादोन लाख टन ऊस गाळपासाठी इतर कारखान्यांना दिला होता. येणारा गळीत हंगाम आव्हात्मक असला तरी सध्या विस्तारीकरनाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कोरोनाचे संकट व इतर काही तांत्रिक अडचणी असल्या तरी जानेवारी मध्ये कारखान्याचे विस्तारीकरण पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचे जगताप यांनी सांगितले.
To Top