सोमेश्वर रिपोर्टर टीम------
५ जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वाघळवाडी व्यायाम ग्रूप च्या वतीने रोपे वाटप करण्यात आली.
सामाजिक बांधिलकी म्हणून या ग्रुप चे सदस्य सुनिल पाटील, पोपट जाधव,अनिल शिंदे, राहुल सावंत,किरण भोसले,सागर शिंदे,विजय गायकवाड,अक्षय शिंगाडे, रमेश गायकवाड,संजय खोमणे, आदींनी नीरा - बारामती रोड वरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना कडुलिंब,वड,पिंपळ,रेन ट्री, आवळा इ.विविध १०० रोपे वाटप केली.
आज जगावर कोरोना सारखे भयानक संकट असल्यामुळे ऑक्सिजन अभावी अनेक जण दगावत आहेत.ऑक्सिजन वाढवणारी रोपे वाटप करण्याचा ह्या मागचा उद्देश असल्याचे ग्रुपचे सदस्य सुनिल पाटील यांनी सांगितले.