...त्यामुळे या सरकार विरोधात निर्णायक लढ्याच्या तयारीला लागा : पडळकर यांचे कोऱ्हाळे येथे आवाहन

Admin
हेमंत गडकरी
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 
हे सरकार आकड्यांचा खेळ करून फसवणूक करत सत्तेवर आले आहे. त्यामुळे तुम्ही आता पवार काका पुतण्याची गुलामगिरी सोडा असा हल्ला भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
            आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी समाजाच्या मागण्या संदर्भात जनजागृती करण्यासाठी बारामती दौऱ्यावर आले होते. यावेळी कोऱ्हाळे बुद्रुक येथे आयोजित घोंगडी बैठकीत ते बोलत होते.
               ते पुढे म्हणाले की या सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले नाही. यामुळे ओबीसी समाजाचे देखील आरक्षण धोक्यात आले आहे. फडणवीस सरकारने धनगर समाजाला दिलेल्या सवलती यांना देता आल्या नाहीत. अजित पवार सर्वोच्च न्यायालयाचा चुकीचा हवाला देत वेळ मारून नेत आहेत. समाजातील अनेक लहान जाती मध्ये या सरकार विरोधात असंतोष आहे. त्यामुळे या सरकार विरोधात निर्णायक लढ्याला तयारीला लागा. असेही पडळकर यांनी सांगितले.
To Top