.....अनं बारामतीकरांच्या नजरा खिळाल्या आकाशाकडे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

बारामती शहर व तालुका परिसरात मागील दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून आकाश निरभ्र होते .दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान सूर्याभोवती पडलेले खळे पहावयास मिळाली  .अन् बारामतीकरांच्या नजरा खिळल्या आकाशाकडे  अनेकांनी त्याला आपल्या मोबाइलवरती कॅमेऱ्यामध्ये कैद केले व सोशल मिडीयावर ती फोटो शेअर केले गेले हे खळे आकाशात बराच वेळ असल्याने याची चर्चा तालुकाभर पसरली होती यामुळे बऱ्याच तर्कवितर्कांना उधाण आले होते .   
       यामुळे या मागचे खगोल कारण जाणून घेण्याकरिता कोल्हापुरातील खगोलशास्त्रज्ञ अभ्यासक डॉक्टर क्टर प्राध्यापक मिलिंद कारंजकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ,सूर्याभोवती पडणारे खळं हे फिजिक्स मधील ऑप्टीकस चा भाग आहे.सूर्या भोवतालचा खळं किवां रिंगण हा प्रिसम मधून किरणे गेल्यानंतर जसे सप्त रंग दिसतात तसाच हा प्रकार आहे .या सूर्याभोवतीलच्या खळ्यास इंग्रजी मध्ये हॅलो (halo)असे म्हणतात.तसेच मराठीमध्ये इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ असे म्हणतात. वादळ आल्यनंतर आकाशामध्ये जवळ जवळ 20 हजार फूट उंचीवरती सिरस नावाचे ढग तयार होतात .या ढगांच्या मध्ये लाखों च्या संख्यने लहान लहान बर्फाचे क्रिस्टल्स असतात.या क्रिस्टल्स मधून सूर्याची किरणे गेल्यानंतर त्या किरणांचे रिफ्लेक्शन किंवा रिफ्रॅकशन किंवा स्प्लिंटिंग होते.या मध्ये बर्फाचे असनारे तुकडे हे  प्रिझम सारखे काम करतात.पाण्याचा  रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा  १. ३३ आहे.पाणी हे द्रव स्वरूपात असते तर बर्फ हा घन पदार्थ असतो.त्यामुळे हवेतून सूर्याची किरणे जेंव्हा घन पदार्थ मधून जातात तेव्हा माध्यम बदलते व किरणांचे वक्रीकरण होते.यातूनच सूर्याभोवतीलचे खळं पाहावयास मिळते.या गोलाची त्रिज्या २३ अंश डिग्री इतकी असते.यामध्ये या गोलाच्या आतील बाजूस लाल रंग दिसतो तर बाहेरच्या बाजूस निळा रंग दिसतो.हे खळे फक्त सूर्या भोवतीच दिसते असे नाही तर चंद्राभोवती देखील असे खळे दिसते.या मध्ये कुठीलीही अंधश्रद्धा बाळगू नये .
प्रा . डॉ .मिलिंद मनोहर कारंजकर 
पदार्थ विज्ञान  व खगोल शास्त्र विभाग प्रमुख 
विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर .
To Top