बारामती l कामाचे पैसे मागितल्याने बेदम मारहाण : चौघांविरोधात गुन्हा दाखल

Admin
बारामती : उमेश दुबे
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----

वाळूची गाडी भरून देणार्‍या सहा कामगारांनी पैसे मागितल्याच्या रागातून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत दुचाकींची तोडफ़ोड करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामती तालुक्यातील कर्‍हावागज येथील चौकात १९ जून रोजी ही घटना घडली.
माऊली काशिद रा.मेडद, ता.बारामती, ऋषी चव्हाण रा.अजंणगाव, ता.बारामती, इंद्रजीत सोनवणे रा.कर्‍हावागज, ता.बारामती आणि भैय्या नावाचा अन्य एक तरूण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आकाश कैलास शिंदे रा.पतंगशहानगर, पाटस रोड,बारामती याने बारामती तालुका पोलीस ठाण्याबाबत याबाबत फ़िर्याद दिली. 
आकाश हा अक्षय पवार, विकाश शिंदे, राजू पवार, सुभाष पवार, किरण फ़डतरे यांच्यासह १९ जून रोजी मोरगाव येथे मुरूम उचलण्याच्या कामासाठी दुचाकींवरून गेले होते. सायंकाळी ते परत येत असताना कर्‍हावागज येथील चौकात ते थांबले. तेथे पूर्वीपासूनच ऋषी चव्हाण, माऊली काशिद,इंद्रजीत सोनवणे हे उभे होते. आकाशने आठ दिवसांपूर्वी वाळू भरून दिलेल्या कामाचे पैसे मागितले असता माऊलीने त्यास कसले पैसे, पैसे विसर आता असे म्हणत शिवीगाळ केली. पैसे देऊ नका पण शिवीगाळ का करता, असे आकाश म्हणू लागला असता आरोपींनी टेम्पोमधून लाकडी दांडके काढत मारहाण करण्यास सुरूवात केली. 
काशिद सोनावणे यांनी दुचाकीला लावलेले कोयते काढून त्यांच्यावर उगारले. मारहाणीचा हा प्रकार बघून लोकांनी तिकडे धाव घेतली. भांडणात कोण पडले तर एकेकाला जीवंत सोडणार नाही अशी धमकी त्यांनी लोकांना दिली. आकाश व त्याच्या मित्रांच्या दुचाकींची तोडफ़ोड करण्यात आली. दहशतीच्या या प्रकारामुळे चौकातील लोक हॉटेल, टपर्‍या, दुकाने बंद करून पळून गेल्याचे फ़िर्यादीत म्हटले आहे.
To Top