सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
सासवड ता.पुरंदर येथे मल्टिलेव्हल मार्केटिंगची कंपनी (चैन सिस्टीम) ही कंपनी २८ सप्टेंबर २०२० रोजी सुरू केली.
या कंपनीने १४९९ रुपयाचे टेमसेल नावाचे प्रॉडक्ट त्या बदल्यात पैसे गुंतवनुकदारांना दिले जात असे. ती बॉटल रोगप्रतिकार शक्तिवर्धक आहे असे सांगितले जात असे. ती रक्कम जमा करुन त्यावरून आय डी जनरेट केला जात.जेवढे व्यक्ती जोडले जातील तेवढ्या पटीत प्रति व्यक्ती २० रूपये अकाऊंट वर जमा होत.जेवढे अधिक पैसे गुंतवणूक करीत तेवढे अधिक पैसे मिळण्याचे आमिष गुंतवणूक दारांना दाखवले जात.असे बऱ्याच मोठ्या प्रमाणात या कंपनीची मेंबरशिप अनेक लोकांनी घेतली. काही दिवस या सभासदत्व असलेल्या लोकांच्या अकाउंटवर पैसे जमा देखील झाले. परंतु काही दिवसातच म्हणजे ३ जानेवारी २०२१ रोजी ही कंपनी बंद करण्यात आली. या कंपनीचे सर्व मालकांनी पैसे घेऊन पोबारा केला असल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. यात सासवड मधील अनेक लोकांची फसवणूक झालेली आहे. तरीदेखील पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नाही. याबाबत पोलीस यंत्रनेदेखील ठोस पावले उचलण्याची गरज आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधिने असेच एक ठेवीदार संदीप माने यांच्याशी केलेली बातचीत. या कंपनीच्या संचालकाबरोबर आमच्या प्रतिनिधिने संपर्क केला असता त्याने उतरे देण्यास टाळाटाळ केली.