सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----
पुणे येथील आर के बहुउद्देशीय संस्था यांचे वतीने राज्यातील विविध क्षेत्रात कोरोना काळात व त्या अगोदर काम करणाऱ्या १० सामाजीक कार्यकर्त्याना आर के बहु उद्देशीय पुरस्काराने राज्याचे मा. गृहराज्यमंत्री रमेश बागवे ,माईंड पावर चेंज चे डॉ.दत्ता कोहीनकर ,रमाई स्मारक समिती चे विठ्ठल गायकवाड,नगरसेवक अविनाश गायकवाड,वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर,संस्थेचे अध्यक्ष आनंद साळुंखे व भाग्यश्री साळुंखे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ॲड गणेश आळंदीकर यानी कोरोना पुर्वी व कोरोना काळात पत्रकार गृप ,आजी माजी सैनिक संघटना ,सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट ,सोमेश्वर स्पोर्ट्स ॲकॅडमी व वकिलीच्या माध्यमातून तसेच वैयक्तिक मदतीतुन केलेल्या सामाजीक कार्याची दखल घेवुन त्याना हा पुरस्कार देण्यात आला .
माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यानी खऱ्या समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती ना आर के प्रतिष्ठान तर्फे पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिष्ठान चे अध्यक्ष आनंद साळुंखे व सचीव भाग्यश्री साळुंखे यांचे विशेष आभार मानले . पुणे येथील अरुण वैद्य स्टेडियम मधे हा कार्यक्रम पार पडला .
दैनिक लोकमतचे पत्रकार महेश जगताप , रस्त्यावरचे मनोरुग्णाना दवाखान्यात नेऊन त्यांच्यावर उपचार करुन प्रसंगी त्याना घरी ठेवुन त्यांचे संगोपन करणारे ,मनोरुग्ण महिलांच्या प्रसुती करुन त्यांच्या बाळांची व्यवस्था करणारे योगेश मालखेरे त्याना आर्थीक मदत करणारे व कोरोना काळात स्वखर्चातुन लाखो रुपयांचे सामाजीक कार्य करणारे वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर ,दैनिक प्रभात द्वारे पत्रकारीतेतुन सामाजीक हित जोपासणारे कार्यकारी संपादक अविनाश भट ,पोलीस निरीक्षक संतोष गायके ,पोलीस निरीक्षक सय्यद ,प्रवीण ओझा ,राष्ट्रवादी च्या महिला कार्यकर्त्या शिवानी माळवदकर ,भाजप च्या नगरसेविका सवीता वैरागे ,झुम ऑन टीव्ही चे नागनाथ होनमाने ,कर्जत चे कानसा वारणा ट्रस्ट चे अध्यक्ष दिपक पाटील आदी मान्यवराना पुरस्कार देवुन गौरविण्यात आले .
आत्तापर्यंत या मान्यवरांनी स्वत: तर काम केले मात्र ईतर कोरोना योद्ध्यांचा सन्मान केला मात्र त्यांच्याही पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्याना आणखी प्रोत्साहन मिळेल या हेतुने आपण हे पुरस्कार दिले असे संस्थेच्या सचीव भाग्यश्री साळुंखे यानी आपल्या मनोगतात सांगीतले .नगरसेवक अविनाश बागवे यानी प्रामाणीक सामाजीक कार्य करणाराची दखल घेतलीच जाते वर्षानुवर्षे आम्हाला निवडुन देवुन आम्हाला कार्याची पावती समाजाने दिली असल्याचे ते म्हणाले.
मा गृहराज्यमंत्री रमेश बागवे यानी राज्यात गृहमंत्री असताना आलेले अनुभव सांगत पोलीसांचे कार्य सर्वात अवघड असते पोलीस व पुढारी वर्गाला कितीही काम केले तरी टिकाना सामोरे जावे लागते असे सांगीतले .डॉ दत्ता कोहीनकर यानी टिकाकाराचा नेहमी आदर करा कारण ते तुमच्या अनुपस्थितीत तुम्हाला कायम चर्चेत ठेवतात सकारात्मक रहा उशीरा का होईना समाज तुमची दखल घेतो असे ते म्हणालें.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रमाई स्मारक समिती अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यानी केले व आभार भाग्यश्री साळुंखे यानी मानले .