सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यांने गाळप हंगाम सन २०२०- २१ मध्ये तुटून गेलेल्या उसापोटी सभासदांना प्रतिटन १०० रुपये कांडे पेमेंट देण्याचे जाहीर केले.शुक्रवार दि.११ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी सांगितले.यावेळी उपाध्यक्ष तानाजी कोकरे,सर्व संचालक,कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. कारखान्याने यापूर्वी यंदाच्या गाळप हंगामात तुटून आलेल्या उसाला एफ आर पी प्रमाणे २४५९ रुपये प्रतिटन शेतकरी सभासदांना दिले आहेत.माळेगाव साखर कारखाने यंदाच्या गाळप हंगामात विक्रमी ऊस गाळप केले आहे.यामध्ये १२ लाख ६७ हजार मे. टन उसाचे गाळप करून १४ लाख १५ हजार साखर पोत्याचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.