ज्युबिलंट इनग्रेव्हिया लि. मध्ये ज्युबिलंट कामगार युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात झालेल्या वेतनवाढीच्या करारात कामगारांना दरमहा १६ हजार एकरकमी वाढ देण्यात आली. अशी भरघोस वाढ करणारी ज्युबिलंट पश्चिम महाराष्ट्रातील केमिकल उद्योगातील पहिलीच कंपनी ठरली आहे. ही वाढ तीन वर्षांसाठी असून रक्कम एकरकमी दिली जाणार आहे. हा करार १ जुलै २०२० ते ३० जून २०२३ या कालावधी साठी लागू राहणार आहे. या कराराचा फायदा सुमारे ७० कामगारांना होणार आहे.
कोरोना काळात भरघोस वाढ झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संघटनेच्या वतीने करारावर शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतिश काकडे, उपाध्यक्ष सुरेशराव कोरडे, सेक्रेटरी सुनीलदत्त देशमुख, खजिनदार नंदकुमार निगडे यांlनी स्वाक्षरी केल्या. स्थानिक व्यवस्थापन आणि संघटनेमध्ये सलोख्याचे वातावरण असून संघटनेने व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत. व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे उपाध्यक्ष सतिश भट, राजेंद्र राघव, मुकेशसिंग, एचआर प्रमुख दीपक सोनटक्के, सूर्यकांत पाटील, श्रीकांत अरावट्टु यांनी करारावर सह्या केल्या. कंपनीच्या इतिहासातील गेल्या तीस वर्षातील हा ऐतिहासिक करार ठरला आहे. यासाठी अशोक वर्मा आणि गौतमसो यांचे सहकार्य लाभले. कामगारांना मृत्यूनंतर १८ लाख विमाही मिळणार आहे.