पुणे : सोमेश्वर रिपोर्टर टीम----
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेत नगर
विकास विभागाने आज पुणे महानगरपालिकेमध्ये 23
गावांचा समावेश केला. पुणे महानगरपालिकेच्या
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गावांची अनुसूची एक आणि
अनुसूची दोन अशा स्वरूपात समावेश केलेला आहे.
पुणे शहरामध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या या गावांमध्ये
महाळुगे, सुस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी,
कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला,
मांजरी बुद्रुक,नरे, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकर वाडी, जांभुळवाडी, कोळेवाडी, वाघोली आदी २३ गावांचा समावेश आहे.