सुपे : सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती तालुक्यातील सुपे येथे घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणीत तीन म्युकरमायकोसिसच्या संशयीत रुग्ण आढळुन आले आहे.
सुपे येथील मयुरेश्वर प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त म्युकरमायकोसिसचे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी परिसरातील ३१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. दरम्यान यावेळी म्युकरमायकोसिस संशयीत तीन रुग्ण आढळुन आले. यावेळी त्यांची प्राथमिक तपासणी करुण पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर व बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते सुपे परगण्यातील १३ ग्रामपंचायत व राष्ट्रवादी भवन येथे ॲटोमॅटीक सॅनिटाईजर मशीनचे वितरण व ८५ कुटुंबांना करत असलेल्या मदतीपैकी १० कुटुंबांना मदतीचे वितरण करण्यात आले. तर उर्वरित कुटुंबांना मयुरेश्वर प्रतिष्ठानचे पदाधिकारी घरपोच मदत करतील अशी माहिती मयुरेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत जगताप यांनी दिली.
या कार्यक्रमाला बारामती नगर परिषदेचे गटनेते सचिन सातव, बारामती पं. स. चे उपसभापती रोहित कोकरे, जि. प. सदस्य भरत खैरे, पं. स. सदस्या निता बारवकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष पोपट पानसरे, माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कौले, बी. के. हिरवे, शौकत कोतवाल, संजय दरेकर, हनुमंत शेळके, गणेश चांदगुडे, मनीषा चांदगुडे, संपत जगताप, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, तसेच आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी मयुरेश्वर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तुषार हिरवे, महेश चांदगुडे आदीसह कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
.............................................