थोपटेवाडी येथील चौफुला ते उंबरचारी रस्त्याला १० लाखाचा निधी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------

बारामती तालुक्यातील थोपटेवाडी गावातील चौफुला ते उंबरचारी या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ नुकताच बारामती पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य प्रदीप बापू धापटे, थोपटेवाडी गावच्या सरपंच रेखा ताई बनकर व उपसरपंच कल्याण गावडे यांच्या उपस्थितीत पार पडला. या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षापासून बिकट झाली असून  पावसाळ्यात या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या विशेष करून शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. प्रदीप बापू धापटे यांनी या रस्त्याच्या निधीसाठी पाठपुरावा केला होता. आमदार निधीतून या रस्त्यासाठी दहा लाख रुपये मंजूर झाले असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.   उर्वरित रस्त्याच्या निधीसाठीही पाठपुरावा केला असून लवकरच उर्वरित रस्त्याच्या कामासाठी निधी पडणार असल्याचे सरपंच रेखा बनकर  व उपसरपंच कल्याण गावडे यांनी यावेळी सांगितले.  यावेळी सचिन वाघ,नानासो थोपटे,जयवंत थोपटे,शशिकांत पानसरे,सचिन अडागळे, जितेंद्र थोपटे,लालासो कोरडे,संतोष जगदाळे,प्रमोद पानसरे, सुनील गायकवाड,बबन, पानसरे,राजेंद्र थोपटे, धनंजय पडवळ, जितेंद्र पडवळ, वसंत जाधव,तुकाराम पानसरे,हनुमंत जाधव,जितेंद्र थोपटे, संतोष नलवडे,संतोष कदम, बाळा थोपटे, लालसो थोपटे, उपस्थित होते. या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करणार असल्याचे ठेकेदार वैभव खोमणे व प्रीतम कोकणे यांनी सांगितले.
To Top