पुरंदर ! पांगारे परीसरात बिबट्याची दहशत : गोठ्यात बांधलेली कालवड बिबट्याने केली फस्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
परिंचे : राहुल वाघोले

पांगारे (ता.पुरंदर) परिसरात बिबट्याने एक वासरू फस्त केले असून एक वासरू व एक कुत्रा जखमी झाला केला आहे.  दिवसाढवळ्या शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडत असल्याने शेतात गुरे चरण्यासाठी जाणाऱ्या गुराख्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले असल्याचे माजी सरपंच भरत काकडे यांनी सांगितले. गेल्या वर्षभरात अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तातडीने पिंजरा लाऊन या बिबट्याला पकडण्याची मागणी शेतकरी व ग्राहक कल्याण फॉडेशनचे जिल्हा अध्यक्ष संतोष काकडे यांनी केली आहे. 
          पांगारे गावातील कडजाई परिसरात रात्रीच्या वेळी तुकाराम मारुती काकडे यांच्या गोठ्यात बांधलेली कालवड बिबट्याने फस्त केली असून एक कालवड व कुत्र्याच्या मानेला चावा घेतला आहे. दत्तात्रय वसंत काकडे हे सकाळी आठ वाजता हत्तीचा माळ या परिसरात गुरे चरण्यासाठी गेले असता त्यांच्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला होता दत्तात्रय काकडे यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. आठ दिवसांपूर्वी पिलाणवाडी जलाशयाच्या पाणवठ्यावर बिबट्याने हरणाची शिकार केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या घटने बाबत तुकाराम काकडे यांनी  वन विभागाकडे तक्रार केली असून वनपरिक्षेत्र अधिकारी जयश्री जगताप, वनपाल युवराज पाचर्णे, किर्ती मेहेत्रे यांनी घटनास्थळी पहानी करून पंचनामा केला आहे.
         पांगारे परीसरात सहा कालवडी, एक खोड अनेक शेळ्या व कुत्री मारली आहेत.पांगारे घाटात धनगराचा घोडा मारला होता. घाटात रात्रीच्या वेळी अनेक जणांना या बिबट्याने अचानक दर्शन दिल्यामुळे वाहन चालकांची चांगलीच तारांबळ उडाली होती.बिबट्याच्या हल्ल्यात प्रशांत काकडे, मानसिंग काकडे, बाळासो काकडे, पांडुरंग जेधे, या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्याचे संतोष काकडे यांनी सांगितले.बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात पिंजरा लाऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी पांगारे गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
-------------
पांगारे परीसरातील वनरक्षक किर्ती म्हेत्रे यांना विचारले असता बिबट्याचा वावर असणारे क्षेत्र मोठे आहे. शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात जनावरे बांधताना बंदिस्त गोठ्यात बांधण्याचे आवाहन केले.या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने रानडुक्कर,हरिण या प्राण्यांच्या वावर कमी झाला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान टळले आहे.  हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे पंचनामे केले आहेत.
To Top