पप्पुराजे राजेनिंबाळकर यांचे अपघाती निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर : संतोष भोसले

वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील माजी ग्रामपंचायत सदस्य धवलचंद्र (पप्पुराजे) भालचंद्र राजेनिंबाळकर वय ४६  यांचे दुचाकी अपघातात निधन झाले.
       सातारा पुणे महामार्गावर वरवे ता. भोर गावच्या हद्दीत बुधवारी रात्री आठ वाजता हा अपघात झाला. MH12JH8329 या दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जाताना अपघात झाला. पोलिस आणि स्थानीकांनी रूग्नवाहिकेतुन नसरापुर येथिल दवाखान्यात आनले. येथे प्राथमिक उपचार केले. पुढिल उपचारासाठी ससुन रूग्नालयात नेले यावेळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघाताचे कारण समजू शकले नाही अशी माहिती राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप घोरपडे यांनी दिली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व्हाईस चेअरमन दिनकरराव यमाजी राजेनिंबाळकर यांचे नातू वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भालचंद्र दिनकरराव राजे निंबाळकर यांचे ते पुत्र होते.

----------------------
To Top