सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर आयसीयू मल्टिपेशलिस्ट हॉस्पिटल मध्ये आता शासकीय महात्मा फुले व पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत २९९ आजारांवर मोफत उपचार घेता येणार असल्याची माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.
यामध्ये----
सर्व सामान्य शस्त्रक्रिया व उपचार (उदा. मुतखडा)
-पोटाचे विकार व पोटा संबं धीत सर्व अंतर्गत
(उदा.पोटाचा अल्सर, स्वादु पिंडाचे आजार,पांथरी,यकृताचे आजार)
- हाडांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच हाडांचे विकार (उदा.सर्व प्रकारचे फ्रॅक्चर)
- किडनी संबंधीत विकार व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तसेच प्रोस्टेट ग्रंथी चे निदान व शस्त्रक्रिया तसेच मूत्रा शयाचे आजार
-फुफुसा संबंधीत सर्व उपचार (उदा. निमोनिया,कोरोना, दमा)
- व्हेंटिलेटर ची सुविधा तसेच रक्ता संबंधीत सर्व आजारांचे उपचार
- विषारी सर्प दंश, विंचू दं श यावरील उपचार
-विषारी औषध प्राशन केलेल्या रुग्णांवरील उपचार
योजनेच्या लाभासाठी लागणारी आवश्यक कागद पत्रे
- रेशनिंग कार्ड (पिवळे/केशरी)
-ओळख पत्र
(आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड इ.)
या योजनांचा लाभ आपल्या परीसरातील नागरिकांना होणार असुन या अगोदर योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना तालुक्याच्य ठिकाणी जाव लागत होत ती सेवा आता आपल्या ग्रामीण भागातीलश्री. सोमेश्वर आय सी यु हॉस्पिटलमध्ये मिळणार आहे.
या योजनेचा लाभ हा जास्तीत जास्त ग्रामीण भागातील गोर गरीब जनतेला तसेच नागरिकांना कसा देता येईल या साठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू असा विश्वास सोमेश्वर आय सी यु हॉस्पिटल चे प्रमुख डॉ. अनिल कदम यांनी दिला.
या योजने अंतर्गत होणाऱ्या अधिक उपचारांच्या माहिती साठी आपण हॉस्पिटलला भेट देऊन अधिक ची माहिती घेऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता.