मुंबईवरून घरी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला : एक ठार तर चार जखमी

Admin
सातारा : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर टीम------

वेळे गावानजीक कार व टेम्पो यांच्या धडकेत एक व्यक्ती जागीच ठार तर चारजण गंभीर जखमी मध्यरात्री तीनच्या सुमारास मुंबईहून गावी कुटुंबाचा अपघात होऊन यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर चार जण जखमी झाले आहेत. 
           याबात घटनास्थळावरून व भुईंज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि गुरुवारी मध्यरात्री ३ वाजणेच्या सुमारास मुंबईहून हिंगणी ता. माण या आपल्या गावी येत असलेल्या होंडा कार क्रमांक MH04HN0643 हि कार महामार्गावरील दुभाजक ओलांडत असताना पुणेहून सातारा कडे जात असलेला  टेम्पो नंबर MH50N 1883 यांच्या धडकेत झालेल्या अपघातात कारमधील नवनाथ खांडेकर वय ४५ हे उपचारापूर्वी ठार झाले तर सोबत असलेले चारजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. यामध्ये तात्यासो दादा खांडेकर वय २३, सागर नवनाथ खांडेकर वय २१, यमुनाबाई नवनाथ खांडेकर वय ४० सर्व राहणार हिंगणी ता. माण व काशिलिंग माने रा. मानेचेवाडी ता. माण हे कारमधील सर्वजण जखमी झाले आहेत. या सर्वांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.
               दरम्यान मध्यरात्री तीन वाजता झालेल्या या अपघाताचा आवाज ऐकून वेळे ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली व तातडीने मदतकार्याला सुरुवात केल्याने जखमींना सातारा येथील रुग्णालयात जलद दाखल करण्यात आले. भुईंज पोलिसांना घटनास्थळावर धाव घेत तातडीने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.

 वेळे परिसरातील दुभाजाक ठरताहेत प्रवाशांचे कर्दनकाळ मात्र प्रशासन काढतेय कुंभकर्णी झोप
वेळे परिसरातील असणारे अनेक बेकायदेशीर दुभाजक आजपर्यंत अनेक अपघातात असंख्य जीव घेऊन यमाची भूमिका बजावीत आहेत, तर कित्येक आयुष्याची दोरी बळकट असलेले अपघातग्रस्त जायबंदी झालेत मात्र या ठिकाणचे दुभाजक बंद करून किंवा उड्डाणपूल करून हि अपघातांची मालिका रोखण्यासाठी प्रशासन कुंभकर्णी झोपेतून बाहेर येईल काय ? असा सवाल परीसरातील ग्रामस्थ करीत आहेत. 

 तातडीचे उपचार झाले असते तर वाचले असते प्राण
या अपघातातील मयत व्यक्तीस याच परिसरात तातडीने आरोग्यसुविधा उपलब्ध झाली असती तर त्याचे प्राण वाचू शकले असते. परिसरातील अपघातग्रस्त रुग्णांना नजीकच्या अद्यावत खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यास अनेक अपघातग्रास्तांचे प्राण वाचू शकतात. परंतु भुईंज येथे मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालय  जिल्हा प्रशासनाच्या वेळ काढू वृतीने आजपर्यंत कार्यन्वित नाही तर भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात एम.बी.बी.एस. डॉक्टरसुद्धा पाठपुरावा करून मिळत नाही.
To Top